शुक्रवार, 19 जनवरी 2018

फिल्म / चित्रपट / कला आणि महिलांसाठी सावधगिरी

फिल्म / चित्रपट / कला

फ्रेशर महिलानी अभिनय क्षेत्रात उतरतांना सावध होण्याची गरज

महाराष्ट्र हे भारताच्या सर्वात मोठ्या उद्योगाची अर्थात फिल्म इंडस्ट्रीची राजधानी. काहींना यात जन्मजात वारसा आरक्षण. काहींना प्रशिक्षण नसलं तरी अनेक चित्रपट आरक्षित असतात. याच इंडस्ट्रीला मात्र महाराष्ट्रीय कलाकारांचं वावडं.
इंडस्ट्री चे लोक महाराष्ट्रीय मराठी कलाकार आहे, हे पाहताच त्यास नकार देतात, त्याला अनेक दिवस नकार देतात, खर्चात पाडतात, नैराश्यग्रस्त करतात, त्याचं वय एजबार करतात. हे पुरुषांच्या बाबतीत सहज होतं.
महिलांचं चित्र तर खूपच विचित्र. त्यांना शरीर संबंध ठेवल्या शिवाय इंडस्ट्रीत प्रवेशच मिळत नाही, अशी प्रथा असल्याचं काही लोक हवा करतात, आणि अनेक लोक त्यास सत्यात उतरवतात. जसे फ्रेशर महिलेस गुंगीचे औषध देऊन अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करून सरळ वेश्यालयात पाठवलं जातं. अनेक घटना अशा घडविल्या आहेत. जेणे करून बहुजन पालकांनी अभिनयाचा विचार डोक्यात आणूच नये.
बहुजन अभिनय महिला कलाकारांनी अज्ञात व्यक्ती अज्ञात ठिकाणी ऑडिशन किंवा चित्रीकरणाच्या वेळी पालकांना घेऊन जावे. आपले लोकेशन जवळच्या सर्वाना सांगावं.
एखादी कंपनीची अभिनयाची जाहिरात आली असेल तर कंपनी अस्तित्वात आहे का? ऑनलाईन खात्री करावी.  कंपनीचे नाव नसेल तर अशा भोंदू जाहिरातींपासून दूर राहावे. जाहिरातीत पत्ता दिला आहे का? खात्री करावी. राजकीय पक्षाशी निगडित आहे का? अशा अनेक बाबी आपण तपासून पाहू शकता. पालकांनी आपल्या पाल्यास आवड असलेल्या क्षेत्रात जाण्यास नकार देऊ नये, कारण ती माघारी न सांगता गेल्यास धोका होऊ शकतो. समाजात परिचित व स्थानिक निर्माते आणि दिग्दर्शक यांचेकडे प्राधान्य द्यावे. बहुजन पुरुष व महिलांसाठी लीड रोल / फिल्म गायिका साठीचे दरवाजे शंभर वर्षांपासून अजूनही बंद आहेत. ते बहुजनांना का बंद असावेत, याचा विचार आपण केल्यास आपण संभाव्य कारणांचा तर्क करू शकता. असे असले तरी बहुजनांना विरोध करणाऱ्यात, बंदी करणाऱ्यात काही अपवाद म्हणून चांगले लोक आहेत, असे म्हणायला फारच कमी गुंजाईश आहे, हे मात्र नक्की !!
  • चारुशील माने




कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें