शनिवार, 29 जून 2024

Buddhism and challenges

 बौद्ध धर्म व कर्मकांड

लग्न असो किंवा वाढदिवस, सर्वात जास्त गाथा म्हणणारा धर्म म्हणजे बौद्ध अशी धारणा बहुजन समाजात निर्माण करण्यास आजचा बौद्ध समाज ठरला आहे. कारण मुळात बौद्ध महासभा हीच अंधश्रद्धा पसरविते. (पुराव्यासाठी बौद्धपुजा पाठ वाचा). 

मनुस्मृती चे अनेक कर्मकांड अजून बौद्धांमध्ये अस्तित्वात

वास्तुशांती, मरणजेवण (तेरावी), वस्तू पूजा, मनगटास धागा बांधणे, तांब्याच्या पात्रात पाणी  पूजा करून पिणे, मंगळसूत्र, अगरबत्ती, मेणबत्ती लावणे इत्यादी अनेक कर्मकांड मनुस्मृतीचा भाग आहे.

ए आय टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये देखील बौद्ध लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार करा म्हणतात परंतु गौतम बुद्धाची जयंती मात्र तिथीनुसार साजरी करतात जेथे जपान सारखा सुधारित देश आठ एप्रिल रोजी बुद्ध जयंती साजरा करतो त्यास देखील भारतातील बौद्ध मान्यता देऊ शकत नाहीत कारण ते वैचारिक दृष्ट्या एक नाही.

बौद्ध कोण? बौद्ध हे इंडिया मध्ये अस्तित्वात नाहीत, ते स्वतः ला व समूहाला उपजातीने ओळखतात व उपजातीला शक्ती समजतात, त्यामुळे इतर जाती त्यांची जातीयवादी मानसिकता ओळखून ते धार्मिक कट्टर जातीयवादी समजतात. आज हिंदू धर्माप्रमाणे बौद्धा मध्ये बौद्ध फलाना, बौद्ध बिस्ताना अशी वर्गवारी झाली आहे. त्यांना पण इतर बौद्ध उपजाती रोटी बेटी पैकी बेटी व्यवहार करण्यास तयार नाहीत.

फेसबुक वर व 14 एप्रिल रोजी फक्त  

एकत्र असतात, धर्माच्या नावाखाली. पण sc च्या इतर एक सुद्धा जातीला बौद्ध विचारधारेने प्रवृत्त करून बौद्ध म्हणून समाविष्ट करू शकले नाही. 


भिक्षु वर्ग

 आज चा भिक्षु वर्ग कोणालाच शिक्षण देत नाही. विद्यार्थी घडविणे तर कोसो दूर! भिक्षु वर्ग जर सर्व जाती धर्माच्या लोकांना नालंदा, तक्षशिला सारखं मोफत शिक्षण देऊ लागला तर बौद्ध हे बहुजन हिताय च्या व्यापक दृष्टीत सामाजिक दृष्ट्या येऊ शकतात. 

राजकीय समीकरण

 राजकीय दृष्ट्या बौद्ध कायम विखुरल्या गेलेत.

 तुकडे तुकडे गँग असल्याचा पुरावा खालील फोटो पहा ज्यात 52 बौद्ध पक्ष आहेत. यात अपक्ष जोडले तर ही संख्या लाखों मध्ये नाही तर करोडो मध्ये जाईल.


उद्योग पासून दूर बौद्ध वर्ग

बौद्धांमधील प्रत्येक कुटुंबात नेता लीडर बनण्याची भावना जास्त असते. त्यामुळे ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या राजकीय व सामाजिक संघटनेच्या पदाचा उपयोग करून उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयातून थोडेफार पैसे मिळवून उपजीविका करतात. परंतु उद्योगासाठी त्यांची मानसिकता तयार राहत नाही. आणि एखाद्या बौद्ध व्यक्तीने एखादा व्यवसाय सुरू केला तर त्या उद्योगावर इतर वरिष्ठ जातीच्या लोकांचा बहिष्कार दिसून येतो हे देखील एक प्रमुख कारण आहे बौद्ध लोक उद्योगाकडे न वळण्याचे.

परंतु आजच्या काळात ऑनलाईनसारखे जसे ऍमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे अनेक माध्यम आहेत, ज्यातून आपल्या प्रॉडक्टची विक्री करता येऊ शकते.